निश्चयाचा महामेरु
निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥"
"परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥"
"यशवन्त कीर्तिवन्त सामर्थ्यवंत वरदवन्त । नीतिवन्त पुण्यवंत । जाणता राजा ॥"
"आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ । सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥"
"नरपति हयपति गजपति गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागीं ॥" "धीर उदार गंभीर शूर क्रियेसि तत्पर सावधपणे नृपवर । तुच्छ
केले ॥"
"तीर्थक्षेत्रे मोडिली ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥"
"देव-धर्म गोब्राह्मण करावया संरक्षण । हृदयस्थ जाला नारायण
| प्रेरणा केली ॥"
"उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्त तार्किक
सभानायक | तुमच्या ठायी ॥"
"या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥"
"आणिकही धर्मकृत्ये चालती। आश्रित होऊन कित्येक राहती । धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ||"
"कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला शिवकल्याण राजा ॥"
"तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले । ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥"
"सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हाप्रती धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥"
"उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥
निश्चयाचा महामेरु The pole of determination
0 टिप्पण्या